चंदगड आगाराच्या निगडी, सांगली व कोल्हापूर मुक्काम बस सुरू - चंदगड लाईव्ह न्युज

12 June 2021

चंदगड आगाराच्या निगडी, सांगली व कोल्हापूर मुक्काम बस सुरूचंदगड : सी. एल. वृत्तसेवा 
     चंदगड आगाराच्या निगडी- पुणे, सांगली व कोल्हापूर या मुक्कामाच्या बस प्रवाशांच्या सेवेत दाखल झाल्या आहेत. याशिवाय सुरू असलेल्या इतर बससेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन चंदगड आगाराचे नवे व्यवस्थापक अमर निकम यांनी केले आहे.
    गेल्या सव्वा वर्षात कोरोना महामारी चा जबर फटका सर्वच उद्योग व्यवसायांना बसला तसा किंबहुना त्यापेक्षाही अधिक तो राज्य परिवहन महामंडळाला बसला. कोरोनामुळे अध्याप बससेवा सुरू नाही. असली तरी प्रवासी मिळणे कठीण बनले आहे. यातूनही चंदगड आगाराचे नवे व्यवस्थापक अमर निकम यांनी काही मार्गावर बससेवा सुरू करण्याचे धाडस उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्या समन्वयाने दाखवले आहे.
      चंदगड आगारातून दिवसभरात चंदगड कोल्हापूर सकाळी ७.१५, दुपारी २.०० व  सायंकाळी ५.०० वाजता (मुक्काम) अशा तीन फेऱ्या, निगडी- पुणे सकाळी ९.०० वाजता (मुक्काम) तर सांगली (मुक्काम) दुपारी ४.०० वाजता चंदगड मधून निघतात. याशिवाय सकाळी ८.००  व दुपारी १२ वाजता चंदगड- गडहिंग्लज-चंदगड या सेवा सुरू केल्या आहेत. स्थानिक ग्रामीण फेऱ्या लॉक डाऊन कालावधी सुरू असल्यामुळे बंद आहेत. सध्या चालू असलेल्या वरील लांब पल्ल्याच्या गाड्यांचा लाभ प्रवासी  बांधवांनी घ्यावा घ्यावा असे आवाहन निकम यांनी केले आहे.No comments:

Post a Comment