चंदगड तालुक्यात बियाणे व बीजप्रक्रिया निविष्ठा वाटप - चंदगड लाईव्ह न्युज

12 June 2021

चंदगड तालुक्यात बियाणे व बीजप्रक्रिया निविष्ठा वाटप

 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

      तालुका कृषि अधिकारी चंदगड यांचे मार्फत कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत चंदगड तालुक्यात १०० एकर क्षेत्रावर को ५१ जातीचे भात बियाणे बिजप्रक्रीयेसाठी 1 ॲझोटोब्याक्टर व पी. एस. बी. तसेच निमार्क व झिंक ब्याक्टेरीयाचे वाटप करण्यात आले आहे.

      चंदगड तालुक्यात १०० एकर क्षेत्रावर चार सूत्री भात लागवड कार्यक्रम राबविणेत येणार आहे. १० एकर क्षेत्रावर स्थानिक काळा जीरगा जातीचे भात क्षेत्र वाढ कार्यक्रम घेण्यात येणार आहे. वरील पिकाची ५ एकर क्षेत्रावर लागवड करण्यासाठी वरी बियाणे व जैविक निविष्ठा वाटप करण्यात आल्या आहेत. रासायनिक खताचा वापर कमी करण्यासाठी जैविक निविष्ठा ॲझोटोब्याक्टर, पी. एस. बी, निमार्क व झिंक ब्याक्टेरीया वाटप करण्यात आल्या आहेत. तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर जावून बीज प्रक्रीयाबाबत माहिती कृषि विभागामार्फत देण्यात येत आहे. बीजप्रक्रिया केल्यामुळे बियाणाची उगवण क्षमता वाढते रोपांची रोगप्रतिकार शक्ती वाढते, किडींचा प्रादुर्भाव कमी होतो व उत्पादनात वाढ होते त्यामुळे शेतक-यांनी बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी असे आवाहन तालुका कृषि अधिकारी किरण पाटील यांनी केले आहे.




No comments:

Post a Comment