ग्रामीण भागामध्ये कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाबद्दल जन जागृती करणे आवश्यक- घनश्याम पाऊसकर - चंदगड लाईव्ह न्युज

12 June 2021

ग्रामीण भागामध्ये कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाबद्दल जन जागृती करणे आवश्यक- घनश्याम पाऊसकर

रयतसेवा फाउंडेशन, दाटे यांचेकडून दहा हजार मास्क व सॅनिटायझर चे वाटप

दाटे येथे रयत सेवा फाउंडेशन कडून मास्क व सॅनिटायझरचे वाटप करताना मान्यवर

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

       दाटे (ता. चंदगड) येथील रयत सेवा फाउंडेशन कडून दाटे ग्रुप ग्रामपंचायतच्या अखत्यारीत येणाऱ्या दाटे ,बेळेभाट, नरेवाडी, वरगाव, नाईकवाडा या ठिकाणी दहा हजार मास्क, सॅनिटायझर व कोरोना जनजागृतीच्या माहिती पत्रकांचे वाटप प्रत्येकाच्या घरी जाऊन करण्यात आले.

              रयत सेवा फाउंडेशनचे मार्गदर्शक व मंत्रालयीन अधिकारी श्री. घनश्याम पाऊसकर म्हणाले, '' ग्रामीण भागात आज सुध्दा कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या गंभीर परिणामांची जाणीव दिसून येत नाही.त्यामुळे सदर महामारीबद्दल लोकांमध्ये जन जागृती करण्यासाठी मास्क, सॅनिटायझर व घ्यावयाच्या खबरदारी बद्दल सुचनापत्रक यांचे वाटप करणे आवश्यक आहे".ही गरज ओळखून दाटे ग्रामपंचायतीच्या अधिनस्त 5 गावांमध्ये या साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच अमोल कांबळे,पोलीस पाटील संदिप गुरव, उपसरपंच मधुरा साबळे, ग्रामपंचायत सदस्य किरण नाईक, अनिता पाटील,संतोष मोरे,फाउंडेशन चे प्रा . संजय साबळे, गणपत मोरे , संतोष मोरे,मारूती किंदळेकर, शाहू खरूजकर,, महादेव साबळे, मनोज खरूजकर, महादेव मोरे, लक्ष्मण देसाई, परशराम किणेकर, विवेक पाटील उपस्थित होते.




No comments:

Post a Comment