चंदगड येथील माडखोलकर महाविद्यालयातील १२ विद्यार्थ्यांची निवड - चंदगड लाईव्ह न्युज

01 August 2021

चंदगड येथील माडखोलकर महाविद्यालयातील १२ विद्यार्थ्यांची निवड

 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

       व्हीएस मोटरच्या वतीने विविध पदासाठी चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयांमध्ये कॅम्पस मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. सदर मुलाखतीसाठी तालुक्यातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले विद्यार्थी उपस्थित होते. त्यामधून एकूण बारा विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. मुलाखती घेण्यासाठी कंपनीचे व्यवस्थापक अक्षय कदम व श्रीनिवास पाटील हे उपस्थित होते. यामध्ये ओमकार चंदगडकर, योगेश बल्लाळ, पुनम सुतार, धनश्री सुतार, समर्थ देसाई, योगेश दळवी, निखिल कांबळे, पुनम शिंदे, रुबीना पिरखान, मकानदार यांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या सर्व विदयार्थ्यांचे प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील यांनी अभिनंदन केले. यासाठी प्लेसमेंट विभाग प्रमुख डॉ. आर. एन. साळुखे यांनी विशेष परिश्रम घेतले व मार्गदर्शन केले. यावेळी प्रा. गायकवाड, प्रा. भादवणकर, प्रा.कपिल पाटील, प्रा .वाईगडे उपस्थित होते.
No comments:

Post a Comment