![]() |
जवान प्रशांत जाधव |
तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
जम्मू - काश्मीरमधील ग्लेशियर सियाचीन भागात २२ मराठा लाईट इन्फैट्रीच्या जवानांच्या बसला झालेल्या अपघातात गडहिंग्लज तालुक्यातील एका जवानाचा मृत्यू झाला. प्रशांत शिवाजी जाधव (वय २७, बसर्गे बुद्रुक, ता. गडहिंग्लज) असे मृत जवानाचे नाव आहे. त्यांच्या निधनाची माहिती मिळताच गडहिंग्लज उपविभागात शोककळा पसरली आहे.
शनिवारी (दि. २८) खास विमानाने त्यांचे पार्थिव बेळगाव येथे आणण्यात येणार असून बसर्गे बुद्रुक येथे अत्यसंस्कार होणार आहेत. आज सकाळी सातच्या सुमारास लेहस्टेशन वरून संपूर्ण बटालियन सियाचीनसाठी वेगवेगळ्या बसमधून जात होते. उंच डोंगर कपारी आणि खोल दरी अशा अतिशय अडचणीच्या रस्त्यावरून प्रवास करत असताना एका वळणावर प्रशांतची बस खोल दरीत शौक नदीत कोसळली. यामध्ये सात जवानांचा मृत्यू झाला आहे. या बसमध्ये २२ जवान व चार अधिकारी प्रवास करत होते. २०१४ साली प्रशांत बेळगाव येथील मराठा लाईट इन्फैंट्रीमधून सैन्य दलात भरती झाले होते. त्याच्या निधनाने सर्वत्र शोककळा पसरली आहे.
No comments:
Post a Comment