शिवणगे येथे उद्योजक जोतिबा सांबरेकर यांनी स्वखर्चाने केला रस्ता - चंदगड लाईव्ह न्युज

26 May 2022

शिवणगे येथे उद्योजक जोतिबा सांबरेकर यांनी स्वखर्चाने केला रस्ता

शिवनगे येथे स्वखर्चाने जोतिबा सांबरेकर जेसिबीच्या साह्याने रस्ता करताना


तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसंस्था

           शिवणगे (ता. चंदगड) येथील उद्योजक जोतिबा सटूपा सांबरेकर यांनी स्वखर्चाने गावचे ग्रामदैवत जक्कुबाई मंदिरापासून ते लकीकट्टे धरणाकडे जाणारा एक कि. मी. अंतराचा  पाणंद रस्ता सामाजिक कार्य म्हणून स्वखर्चाने पूर्ण केला.

          नेहमीच समाज कार्यात अग्रेसर असणाऱ्या जोतिबा सांबरेकरानी रस्त्याच्या दोन्ही बाजूने गटारे व खडीकरण करून सर्वांच्या समोर चांगला आदर्श घालून दिला. त्याबद्दल शिवणगे पंचक्रोशीत त्यांचे अभिनंदन होत आहे. या रस्त्यामुळे भाविकाबरोबरच शेतकऱ्यांचीही मोठी सोय झाली आहे.

No comments:

Post a Comment