किणी सेवा संस्थेत आमदार राजेश पाटील गटाचे वर्चस्व, १३ पैकी ११ जागा जिंकल्या - चंदगड लाईव्ह न्युज

25 May 2022

किणी सेवा संस्थेत आमदार राजेश पाटील गटाचे वर्चस्व, १३ पैकी ११ जागा जिंकल्या

 

विजयी पॅनलचे समर्थक गुलालाची उधळण करत जल्लोष करताना.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
       किणी (ता. चंदगड) येथील जय हनुमान विकास सेवा संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्तारूढ  आमदार राजेश नरसिंगराव पाटील गटाच्या श्री कलमेश्वर सहकार विकास पॅनलने निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. १३ जागांपैकी एक जागा पूर्वीच जिंकलेल्या या पॅनेलने निवडणूक लागलेल्या १२ पैकी १० जागा जिंकल्या. विरोधी परिवर्तन आघाडीला दोन जागांवर समाधान मानावे लागले.
विजयी उमेदवार व त्यांना पडलेली मते पुढील प्रमाणे सर्वसाधारण गट किणीकर विरुपाक्ष बसाप्पा- २३०, जोशिलकर भगवान कृष्णा- २२२,  दुंडगेकर सटुपा गोपाळ - २२१, नौकुडकर पुंडलिक सटुपा - २१७, जोशिलकर प्रकाश गावडू - १९५,  मणगुतकर वैजनाथ राणबा - १९२, पुजारी दुंडाप्पा सिद्धाप्पा - १८६, कुट्रे म्हातू वैदू - १८१ (परिवर्तन पॅनल), बाद मते - २०. इतर मागास गट सुतार वसंत जानबा - २२०, बाद मते - १६. महिला राखीव गट जोशिलकर जयश्री जानबा - २२६, बिर्जे सुरेखा पांडुरंग - २०५ (परिवर्तन पॅनल), बाद मते ६. मोटूरे निंगाप्पा नरसु हे यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत. पराभूत उमेदवारांना १७० ते १७८ मते पडली.
निवडणूक निकालानंतर विजयी पॅनेलचे उमेदवार व समर्थकांनी गावात गुलालाची उधळण करत जल्लोष केला. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार विरोधी गटाने वर्चस्व प्रस्थापित केले होते. त्याची पुनरावृत्ती याही निवडणुकीत होईल असा परिवर्तन पॅनेलला विश्वास होता. तथापि तो मतदारांनी फोल ठरविला.No comments:

Post a Comment