कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
चंदगड तालुक्याच्या लाल मातीतील तरुण-तरुणीं मध्ये टॅलेंट ठासून भरलेले आहे. गरज आहे ती केवळ या टॅलेंटला योग्य दिशा व योग्य प्लॅटफॉर्म मिळण्याची. याची पुन्हा एकदा प्रचिती आणून दिली आहे मौजे जट्टेवाडी (ता. चंदगड) येथील तरुण धीरज जोतिबा कोकितकर याने.
नेपाळ देशातील पोखरा येथे नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत या तरुणाने भारताचे प्रतिनिधित्व करताना १०० व २०० मीटर धावण्याच्या दोन्ही स्पर्धेत २ सुवर्णपदके पटकावत अभूतपूर्व कामगिरी केली.
संयुक्त भारतीय खेल फाउंडेशन (SBKF) ने राष्ट्रीय क्रीडा परिषद-नेपाळ व इंदू श्री संघटना-ISO यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या या बहु-क्रीडा कार्यक्रमात एकूण ३९ देशातील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. अशा आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील सुवर्ण कामगिरीमुळे धीरज कोकितकर यांच्यावर क्रीडा क्षेत्रातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

No comments:
Post a Comment