चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
कोल्हापूर जिल्हा परिषद व चंदगड पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ यशवंतनगर (ता. चंदगड) येथे बुधवार दि. ४ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ३ वाजता भव्य प्रचारसभा आयोजित करण्यात आली आहे. या प्रचारसभेला आमदार हसन मुश्रीफ, मा. आम. राजेश पाटील, डॉ. नंदाताई बाभूळकर हे उपस्थित मार्गदर्शन करणार आहेत. या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने वेळेवर उपस्थित राहून सभा यशस्वी करण्याकरिता सहकार्य करावे असे आवाहन राष्ट्रवादी पार्टीच्या वतीने केले आहे.

No comments:
Post a Comment