चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
सरकारी योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणार असून राजकारण करण्यापेक्षा जनतेच्या सेवेला प्राधान्य देणार असल्याची ग्वाही अडकूर पंचायत समिती मतदारसंघाचे उमेदवार रविंद्र बांदिवडेकर यांनी मतदारसंघात प्रचारावेळी दिली.
उमेदवार रविंद्र बांदिवडेकर म्हणाले, ``पाणी, रस्ते, शेती, शिक्षण, आरोग्य आणि रोजगार या मूलभूत प्रश्नांवर काम करणारी सक्षम पंचायत समिती ही काळाची गरज आहे. अशा वेळी जनतेच्या प्रश्नांची जाण असलेला काम करणारा आणि सर्वसामान्यांशी थेट जोडलेला नेता आवश्यक असतो. रवींद्र दादा बांदिवडेकर हे नाव चंदगड परिसरात विश्वासाने घेतले जाते. मी शब्दांपेक्षा कृतीला प्राधान्य दिले आहे. गावातील शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर मार्ग काढण्याचा माझा स्वभाव आहे.``
पंचायत समिती हे फक्त पद नसून ती सेवेची संधी आहे, हा विचार जपला असल्याचे सांगून ते म्हणाले, ``शेतकऱ्यांसाठी पाण्याची योग्य व्यवस्था, अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण, महिलांच्या बचतगटांना बळकटी, युवकांसाठी शिक्षण व रोजगाराच्या संधी, तसेच स्वच्छ आणि पारदर्शक कारभार. हे सगळे मुद्दे विकासदृष्टीचा भाग आहेत. सरकारी योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे, ही माझी भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.``

No comments:
Post a Comment