नागनवाडी बाजारामध्ये सौ. राजश्री गावडे व रविंद्र बांदीवडेकर यांचा गावातून प्रचार फेरी काढून प्रचार - चंदगड लाईव्ह न्युज

02 February 2026

नागनवाडी बाजारामध्ये सौ. राजश्री गावडे व रविंद्र बांदीवडेकर यांचा गावातून प्रचार फेरी काढून प्रचार

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

    “निवडणुका येतात आणि जातात, पण संकटकाळात जो धावून येतो तोच आपला माणूस असतो. आमदार शिवाजी पाटील,  सामाजिक कार्यकर्ते व संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष लक्ष्मण गावडे यांच्या माध्यमातून आम्ही आजवर तालुक्यातील प्रत्येक घरापर्यंत मदतीचा हात पोहोचवला आहे. त्यामुळे अडकूर  जिल्हा परिषद गट आमच्यासाठी नवा नसून, येथील जनतेशी आमचे रक्ताचे नाते आहे,” अडकूर जि.प उमेदवार राजश्री लक्ष्मण गावडे यांनी केले. नागनवाडी (ता. चंदगड) येथे पार पडलेल्या भव्य प्रचार सभेत त्या मतदारांशी संवाद साधत होत्या. यावेळी कार्यकर्त्यांचा उत्साह आणि महिलांची मोठी उपस्थिती होती. 

​​     सौ. राजश्री लक्ष्मण गावडे म्हणाल्या, ``आपल्या भाषणात विरोधकांवर टीका करण्याऐवजी आपल्या कामावर भर दिला. मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेच्या दुःखाची आम्हाला पूर्णपणे जाण आहे. लक्ष्मण गावडे यांनी केलेल्या सामाजिक कार्यामुळे अडकूर जिल्हा परिषद व पंचायत समिती एकही गाव आमच्या संपर्कापासून वंचित राहिलेले नाही. ही सामाजिक बांधिलकीच आज आमची मोठी शक्ती बनली आहे. जनतेने आम्हाला केवळ उमेदवार म्हणून नाही, तर कुटुंबातील सदस्य मानतात असे सौ. राजश्री लक्ष्मण पाटील यांनी सांगितले.

     अडकूर पंचायत समिती उमेदवार रविंद्र बांदिवडेकर म्हणाले, ``आमदार शिवाजी पाटील यांच्या शाश्वत विकासासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. विकासकाम कोणतेही असो, त्यामध्ये भाजपच्या माध्यमातून आम्ही कधीही कमी पडणार नाही. चंदगड मतदारसंघात विकासाचा झंझावात सुरु झाला असून त्याला अडकूर पंचायत समिती मतदारसंघ अपवाद नाही. जनतेच्या विश्वासाच्या बळावर आमचा विजय निश्चित आहे.``

No comments:

Post a Comment