जनतेच्या विश्वासावरच मी निवडणुक रिंगणात आहे, विकासात कमी पडणार नाही - सौ. मनिषा अनिल शिवनगेकर, मलतवाडी येथे प्रचार - चंदगड लाईव्ह न्युज

02 February 2026

जनतेच्या विश्वासावरच मी निवडणुक रिंगणात आहे, विकासात कमी पडणार नाही - सौ. मनिषा अनिल शिवनगेकर, मलतवाडी येथे प्रचार


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        माणगाव जिल्हा परिषदेच्या उमेदवार मनिषा अनिल शिवणगेकर यांनी जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने मलतवाडी येथे भव्य प्रचार दौरा केला. या दौऱ्याला गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रत्येक चेहऱ्यावर दिसणारी आशा आणि विकासाची अपेक्षा. हा जनसंपर्क दौरा म्हणजे लोकशाहीचा खरा उत्सव होता. शेतकरी, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक यांच्याशी थेट संवाद साधत त्यांनी प्रत्येक प्रश्न, प्रत्येक भावना मनापासून ऐकून घेतली. ‘जनतेसाठी, जनतेसोबत’ हेच ब्रीद घेऊन विकासाच्या दिशेने एक मजबूत पाऊल टाकण्यात आले. मलतवाडीकरांच्या प्रेमाने आणि पाठिंब्याने हा प्रवास अधिक बळकट झाला आहे. परिवर्तनाचा संकल्प आणि उज्ज्वल भविष्याची आशा घेऊन हा प्रचार दौरा यशस्वी ठरला असल्याचे उमेदवार सौ. मनिषा शिवनगेकर यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment