मांडेदुर्ग केंद्र शाळेमार्फत आषाढी एकादशी निमित्त बाल वारकरी दिंडी, ग्रामस्थांचाही उत्साही सहभाग - चंदगड लाईव्ह न्युज

27 July 2026

मांडेदुर्ग केंद्र शाळेमार्फत आषाढी एकादशी निमित्त बाल वारकरी दिंडी, ग्रामस्थांचाही उत्साही सहभाग

  


चंदगड : सी एल वृत्तसेवा 

  केंद्रशाळा कुमार विद्यामंदिर मांडेदुर्ग (ता चंदगड) येथे आषाढी एकादशीनिमित्त विद्यार्थ्यांनी वारकरी याचबरोबर विठ्ठल रुखमाई... संत तुकाराम संत ज्ञानेश्वर यांच्या वेशभूषेत असणारे विद्यार्थी तसेच डोक्यावर तुळस  घेऊन सहभागी झालेल्या मुली, अशा विविध वेशभूषेत दिंडीत सहभाग नोंदवला. गावातील वारकरी मंडळींनी मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी दिंडीत सहभाग घेतला. गावातील माय भगिनींनी येणाऱ्या दिंडीचे मनोभावे स्वागत करून मुलांच्या वेशभूषेचे कौतुक केले

     दिंडी उपक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक वैजनाथ पाटील, विषय शिक्षक प्रल्हाद पाटील, बी एस कांबळे, अध्यापक शिवाजी पाटील, सुभद्रा पाटील, कविता पाटील, राम कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले. 

 ज्येष्ठ नागरिक बी. एम. पाटील, कडगावकर परिवारा मार्फत दिंडीत सहभागी सर्वांना अल्पोपहार, शाबू चिवडा, राजगिरा लाडू, केळी, चिक्की ची व्यवस्था करून आपलाही सहभाग नोंदवला. ग्रामस्थांनी शाळेच्या या उपक्रमाचे कौतुक केले.

No comments:

Post a Comment