चंदगड : सी एल वृत्तसेवा
चंदगड तालुक्याच्या पश्चिम भागात कालपासून पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. मात्र त्या तुलनेत पूर्वेकडील कर्यात भागात अधून मधून तुरळक सरी येताना दिसत आहेत. सध्या सुरू असलेला पाऊस भात व इतर पिकांसाठी समाधानकारक असला तरी अजून मोठ्या पावसाची गरज आहे.
दुसरीकडे चंदगड तालुक्यातील तीन मध्यम प्रकल्पांपैकी जंगमहट्टी प्रकल्प अजून पूर्ण क्षमतेने भरलेला नसून या धरणात आज दि. २७ जुलै २०२६ रोजी सकाळी ७.०० वाजेपर्यंत ९०% पाणीसाठा झाला आहे. तर कृष्णा खोरे योजनेतून बांधण्यात आलेल्या १८ प्रकल्पांपैकी केवळ दोन-तीन प्रकल्प वगळता अन्य प्रकल्प १००% भरण्याची प्रतीक्षा आहे. दरम्यान संपूर्ण चंदगड तालुक्यात शेतकऱ्यांनी भात रोप लावणी अंतिम टप्प्यात आणली आहे.

No comments:
Post a Comment