चंदगड : सी एल वृत्तसेवा
सध्या सुरू असलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीत हडलगे- नेसरी गटातून जिल्हा परिषदेसाठी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून विद्याधर बाबुराव गुरबे हे निवडणूक लढवत आहेत. त्यांच्यासोबत हडलगे पंचायत समिती गणातून सौ रेश्मा अनिल पाटील तर नेसरी पंचायत समिती गणातून रामचंद्र दत्तू परीट हे काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. या उमेदवारांपैकी विद्याधर बाबुराव गुरबे यांचे समाजकार्य तसेच काँग्रेस पक्षाची कार्यपद्धती ही सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन जाण्याची आहे. हे विचारात घेऊन बहुजनांच्या न्याय हक्कासाठी धर्मनिरपेक्षपणे लढणाऱ्या भीमशक्ती संघटनेने काँग्रेस पक्षाच्या वरील उमेदवारांना जिल्हा परिषद व पंचायत समितीत पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
भीमशक्ती सामाजिक संघटना गडहिंग्लज यांनी पाठिंबा दिल्याची माहिती पत्रकाद्वारे गडहिंग्लज तालुका अध्यक्ष भीमराव सिताराम मोहिते यांनी दिली आहे. पाठिंब्याच्या पत्रकावर मोहिते यांच्यासह कार्याध्यक्ष जी. पी. कांबळे, दक्षिण जिल्हाध्यक्ष संजय कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष परशराम कांबळे, संघटक शिवाप्पा कांबळे, एम. टी. कांबळे, प्रमुख संघटक गोविंद रामनाईक, संपर्कप्रमुख गणपती सिद्धनाईक आदी पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.

No comments:
Post a Comment