तुडये जि. प. व हेरे पं. स. मतदार संघातील नागरिकांनी दाखवलेला विश्वास व दिलेला आशीर्वाद हीच आमची खरी ताकद : सौ. रचना गावडे व संज्योती मळवीकर यांचे मत - चंदगड लाईव्ह न्युज

31 January 2026

तुडये जि. प. व हेरे पं. स. मतदार संघातील नागरिकांनी दाखवलेला विश्वास व दिलेला आशीर्वाद हीच आमची खरी ताकद : सौ. रचना गावडे व संज्योती मळवीकर यांचे मत

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा दि. ३१-१-२०२६

      चंदगड तालुक्यातील तुडये जिल्हा परिषद मतदार संघाच्या प्रचार फेरी वेळी पत्रकारांशी बोलताना तुडये जि. प. च्या उमेदवार सौ. रचना गावडे व हेरे प. स. च्या उमेदवार संज्योती मळवीकर म्हणाल्या, तुडये जिल्हा परिषद गटाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने गावागावात भेट देण्याचा योग आला. प्रचाराला गावकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद व प्रेम पाठिंबा पाहून नव्या उमेदीने काम करण्याची प्रेरणा मिळाली. गावातील प्रत्येक नागरिकांनी दाखवलेला विश्वास आणि दिलेला आशीर्वाद हीच आमची खरी ताकद आहे. या विश्वासावर खरे उतरून तुडये जिल्हा परिषद गटाचा विकास वेगाने पुढे नेण्याचा निर्धार केला आहे, असे निवडणुक रिंगणातील दोन्ही उमेदवारांनी सांगितले. 

    यावेळी त्यांनी मतदारसंघातील लोकांच्या समस्या जाणून घेत, त्या  सोडविण्यासाठी आम्ही राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे ग्वाही त्यांनी मतदारांना दिली. चंदगड विधानसभेचे माजी आम. राजेश पाटील व नंदाताई बाभूळकर यांच्या नेतृत्वाखाली परिसरामध्ये प्रचार उत्तम सुरु असल्याचे सांगतिले.

No comments:

Post a Comment