आमदार शिवाजी पाटील यांनी दिलेले उमेदवार राजश्री गावडे व रवींद्र बांदिवडेकर यांना मताधिक्य देणार - संग्राम अडकुरकर यांची ग्वाही - चंदगड लाईव्ह न्युज

31 January 2026

आमदार शिवाजी पाटील यांनी दिलेले उमेदवार राजश्री गावडे व रवींद्र बांदिवडेकर यांना मताधिक्य देणार - संग्राम अडकुरकर यांची ग्वाही

प्रचार सभेत बोलताना संग्राम अडकूरकर, शेजारी रविंद्र बांदिवडेकर व राजश्री गावडे

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा दि. ३१-१-२०२६

    एका दिलाने एक मताने आमदार शिवाजी पाटील यांनी दिलेले उमेदवार राजश्री गावडे व रवींद्र बांदिवडेकर यांना मताधिक्य देणार असल्याचे मत संग्राम अडकुरकर यांनी व्यक्त केले. अडकूर जिल्हा परिषद मतदार संघातील भाजपाचे उमेदवार सौ. राजश्री लक्ष्मण गावडे व पंचायत समितीचे उमेदवार रवींद्र बांदिवडेकर यांची शिरोली, आमरोळी सह परिसरामध्ये प्रचार सभा घेण्यात आली. त्या प्रचार सभेवेळी संग्राम अडकूरकर बोलत होते.

   विद्यमान आमदार शिवाजी पाटील यांच्या शाश्वत विकासाच्या धोरणावर व सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण गावडे यांच्या संजय गांधी निराधार योजनेत अंतर्गत केलेल्या कामाची आम्ही येथील गावकरी पोहोचपावती देणार आम्ही त्यांच्या विश्वासावर त्या दोन्हीही उमेदवारांना मदत करणार असल्याचे प्रचारावेळी उपस्थित मतदारांनी सांगितले.

   उमेदवार सौ. राजश्री लक्ष्मण गावडे, रवींद्र बांदिवडेकर, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण गावडे, विष्णू गावडे, भाजपाचे युवा कार्यकर्ते पंकज पाटील सह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते महिलावर्ग, शिरोली व अलबादेवी परिसरातील भाजप कार्यकर्ते व मतदार उपस्थित होते. 

     मतदारांचा प्रतिसाद पाहून जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवारांनी आम्ही दिलेला शब्द पाळणार असून विकासकामात कोठेही कमी पडणार नसल्याचा विश्वास मतदारांना दिला.

No comments:

Post a Comment