चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या भूमिका, रणनीती व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा तथा आमदार सौ. चित्राताई वाघ यांची जाहीर सभा सोमवार दि. २ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १२.३० वाजता कोवाड (ता. चंदगड) येथे आयोजित करण्यात आली आहे. या सभेसाठी परिसरातील महिला कार्यकर्त्या, पदाधिकारी व भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
या जाहीर सभेमध्ये आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याबरोबरच महिला सबलीकरण, विकासकामे तसेच केंद्र व राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. या सभेला भाजपचे जिल्हा व तालुका पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, महिला मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:
Post a Comment