तवंदी घाटातील अपघातात नवरीच्या भावासह एकाच कुटूंबातील चार जण जागीच ठार - चंदगड लाईव्ह न्युज

28 May 2022

तवंदी घाटातील अपघातात नवरीच्या भावासह एकाच कुटूंबातील चार जण जागीच ठार

अपघातग्रस्थ वाहन


तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

         वाहनानी अत्यंत गजबजलेल्या पुणे - बंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्रं .४ वर तवंदी घाटात हॉटेल अमर समोर एका धोकादायक वळणावर कंटेनर आणि कारच्या झालेल्या भीषण अपघातात कारमधील जार जण जागीच ठार झाले.  या अपघातात नवरीच्या भावासह चुलते, चुलती व आजीचा मृत्यू दुर्दैवी मृत्यू झाला असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

        या अपघातात छाया आदगोंडा पाटील (वय ५५), आदगोंडा बाबू पाटील (५५), महेश देवगोंडा पाटील (२३), चंपाताई मगदूम (८०) सर्वजण रा. बोरगाववाडी, ता. निपाणी  अशा चौघांचा मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी सकाळच्या सुमारास झाला.

          याबाबतची  अधिक माहिती अशी की, स्तवनिधी येथील मंगल कार्यालयात मुलगीचे लग्न होते म्हणून सर्वजण लग्नकार्यासाठी जात होते. लग्नस्थळापासून केवळ अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या हॉटेल अमर नजीक असलेल्या एका वळणावर कंटेनरने कारला चिरडले. या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. या अपघातात नवरीच्या भावासह, चुलते चुलती व आजीचा मृत्यू झाला आहे. या अपघाताची भीषणता इतकी होती की वाहनांचा चक्काचूर झाला आहे. या अपघातानंतर कारमध्ये सर्व मृतदेह अडकून पडले होते. दरम्यान, जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निबरगी, डीएसपी बसवराज यलीगीर, सीपीआय संगमेश शिवयोगी, उपनिरीक्षक कृष्णवेनी गुर्लहेसूर यांच्यासह अग्निशमन विभागाने घटनास्थळी भेट देऊन मदतकार्य केले.

No comments:

Post a Comment