चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड व माणगाव येथे कल्याण-मुंबई मटका घेणाऱ्या दोघांना चंदगड पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ७,२२६ रूपये मुद्देमाल जप्त केले. चंदगड येथे दयानंद बाप्पा हिरेमठ (वय वर्षे ५२, रा. शिवाजी गल्ली, चंदगड) हा सागर किराणा स्टोअर्स मध्ये मुंबई नावाचा मटका घेत असताना चंदगड पोलिसांनी छापा टाकून त्याच्या कडील रोख रक्कम ६,४५० रुपये पेन व कागद जप्त केले. माणगाव (ता. चंदगड) येथील बाळु यमाजी अर्जुनवाडकर (वय वर्ष ५६) हा राहत्या घरी जनावरांच्या गोठ्यात मुंबई नावाचा मटका घेत असताना कोवाड पोलिसांनी छापा टाकून रंगेहाथ पकडून त्यांच्याकडून १,१७० रूपये रोख रक्कम जप्त केली. हिरेमठ व अर्जुनवाडकर या दोघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
No comments:
Post a Comment