संकल्प संजय रेडेकर |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
लकीकट्टे (ता. चंदगड) येथील संकल्प संजय रेडेकर (वय - १४) हा बालक बोन कॅन्सर (Bone Tumor/neoplasm) या आजाराने ग्रस्त आहे. त्याच्यावर सातारा येथील अॉनको लाईफ कॅन्सर सेंटर येथे रेडीओथेरपीद्वारे उपचार सुरू आहेत. त्याच्या अॉपरेशन साठी ७ ते ८ लाख रुपये खर्च होणार आहे.
संकल्पचे वडील अशिक्षित व गरीब शेतकरी आहेत. घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे. शेतीत पिकेल त्यावर उदरनिर्वाह करणारे कुटुंब. अशातच संकल्पच्या आजाराने त्यांना मानसिक आणि आर्थिक मदतीची गरज आहे. ते स्वतः कधीच आपल्यापर्यंत पोहचू शकत नाहीत. त्यामुळे आम्ही हा संदेश सर्व संवेदनशील दात्यांपर्यंत पोहचवत आहोत. आपल्या छोट्याशा मदतीने चिमुकल्या संकल्पचे प्राण वाचू शकतात. अशा कठीण प्रसंगी त्याला आर्थिक मदतीची गरज आहे. आपली मदत एकाद्या मुलाचे प्राण वाचवू शकते. खालील गुगल पे वर अथवा थेट खात्यात पैसै पाठवून मदत करु शकता.
गुगल पे क्र. :- 7218461858
नाव - संकल्प संजय रेडेकर
खाते क्रमांक:- 091218210012601
IFSC code :- BKID0000912
No comments:
Post a Comment