पारंपारिक देशी वृक्षांचा ठेवा जतन करू - वनपाल आर. वाय. पाटील, माडखोलकर महाविद्यालयात वृक्षारोपण - चंदगड लाईव्ह न्युज

16 July 2022

पारंपारिक देशी वृक्षांचा ठेवा जतन करू - वनपाल आर. वाय. पाटील, माडखोलकर महाविद्यालयात वृक्षारोपण

माडखोलकर महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रमप्रसंगी उपस्थित विद्यार्थी व शिक्षक.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

            पर्यावरणाचा समतोल राखण्याचे कार्य वृक्ष करतात, त्यामुळे झाडे लावने व निसर्गाचे संवर्धन करने हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. अधिकाधिक पारंपारिक देशी वृक्षांची लागण करून हा ठेवा जतन करावा असे प्रतिपादन वनपाल आर. वाय. पाटील यांनी केले. चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालय, चंदगड, राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील होते. 

        प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी प्रा. एस. एन. पाटील यांनी केले. वनपाल पाटील पुढे म्हणाले, ``निसर्ग आपला सोबती आहे, त्याचे जतन करण्याचे काम नव्या पीढीने स्वखुशीने करावे, फक्त झाडे लावून आपले काम संपले असे न मानता, त्या झाडांची संगोपनाची पूर्ण जबाबदारी घेतली पाहिजे. आज लावलेल्या झाडांचा लाभ आपल्या भावी पिढीला नक्की होणार आहे. त्यांच्यासाठी आपली चिरंतन आठवण वृक्षरुपात राहील. प्रत्येकाने झाडे लावा व ती जगवा असा संदेश त्यांनी सर्वाना दिला.`` 

           अध्यक्ष डॉ. पाटील यांनी परदेशी वृक्ष लावणे थांबवा व पारंपारिक, जंगली झाडे व पर्यावरण पूरक फळझाडे, फुलझाडे, औषधी वनस्पतींची जास्तीत जास्त लागवड करा, वृक्षतोड थांबवून उजाड होणारा निसर्ग वाचवा. असा सूचक संदेश दिला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्वयंसेवकांनी व स्टाफने पारंपारिक हिरडा, हेला, चिंच, जांभूळ, कोकम, बावा, आंबा, फणस, माड, करंज, सागवान, वाद, पिंपळ इ. प्रकारची वृक्ष लागवड केली. जास्तित जास्त झाडे जगविण्याचा संकल्प केला. 

          सामाजिक वनीकरण विभागाचे उत्तम सहकार्य लाभले. प्रा. व्ही. के. गावडे, डॉ. एस. डी. गावडे, प्रा. आर. एस. पाटील, डॉ. एन. के. पाटील, डॉ. ए. पी. पाटील, पी. पी. धुरी, शिवराज हासुरे, प्रल्हाद कांबळे इ. एनएसएस, समिती सदस्यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचा सर्व स्टाफ व स्वयंसेवक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ए. डी. कांबळे यांनी केले. आभार डॉ. एन. एस. मासाळ यांनी मानले.

No comments:

Post a Comment