अडकूर येथे घर कोसळून लाखोंचे नुकसान, सुदैवाने निराधार वृद्धा बचावली - चंदगड लाईव्ह न्युज

16 July 2022

अडकूर येथे घर कोसळून लाखोंचे नुकसान, सुदैवाने निराधार वृद्धा बचावली

अडकूर येथे श्रीमती सखुबाई बामणे यांचे पावसाने पडलेले घर


तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

            अडकूर (ता. चंदगड) येथील श्रीमती सखुबाई मारूती बामणे (वय -६५) या वृद्धेचे घर कोसळून ५ लाखांचे नुकसान झाले तर सुदैवाने हि  निराधार वृद्धा या दुर्घटनेत सुदैवाने बचावली.

श्रीमती सखुबाई मारूती बामणे

       अधिक माहिती अशी की, श्रीमती सखुबाई बामणे यांचे अडकूर बाजारपेठेत राहते घर आहे. पूर्णपणे निराधार असलेल्या सखुबाई या घरात एकट्याच रहातात. काल रात्री ११ वाजता हे घर पडले. पण या झोपलेल्या सखुबाई सुदैवाने बचावल्या. पण अल्पभूदारक असणाऱ्या सखूबाईचे संपूर्ण घरच उध्वस्थ झाल्याने त्यांना आता आधाराची गरज आहे.

No comments:

Post a Comment