डॉ. राजेश घोरपडे यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार - चंदगड लाईव्ह न्युज

28 March 2023

डॉ. राजेश घोरपडे यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार

 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         हलकर्णी  (ता. चंदगड) येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागप्रमुख डॉ. राजेश घोरपडे यांना नॅशनल रुरल फाउंडेशन, बेळगाव यांच्यातर्फे राष्ट्रीय आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.हरमल गोवा येथील गणपत पार्सेकर कॉलेज ऑफ एज्युकेशन येथे झालेल्या समारंभात त्यांना हा पुरस्कार माजी केंद्रिय मंत्री रत्नमाला सावनूर यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. 

       यावेळी माजी आमदार संपतबापू पवार, जिल्हा कमांडर अरविंद घट्टी, फौंडेशनचे पदाधिकारी तसेच सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सहकार क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते. डॉ. घोरपडे हे गेली 23 वर्षे यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात भौतिकशास्त्र विषयाचे अध्यापन करीत आहेत. विविध आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये त्यांचे संशोधन लेख प्रसिद्ध झाले आहेत. दिल्ली, कलकत्ता, गुलबर्गा इत्यादी अनेक ठिकाणी त्यांनी शोधनिबंधाचे सादरीकरण केले आहे. विविध विषयावरील परिसंवाद व कार्यशाळांचे आयोजन केले. शिवाजी विद्यापीठ भौतिकशास्त्र विषयाच्या अभ्यास मंडळावर त्यांची निवड झाली आहे. 

     राष्ट्रीय सेवा योजना, सांस्कृतिक विभाग, स्पर्धा परीक्षा इत्यादीच्या माध्यमातून त्यांनी अनेक उपक्रम राबविले. रवळनाथ गृह फायनान्स शाखा चंदगडचे ते सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दौलत विश्वस्त संस्थेचे मार्गदर्शक गोपाळराव पाटील, अध्यक्ष अशोक जाधव, उपाध्यक्ष संजय पाटील, सचिव विशाल पाटील, प्राचार्य डॉ. बी. डी. अजळकर, प्राध्यापक व कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment