राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल सरपंच शिवाजी तुपारे यांचा सत्कार - चंदगड लाईव्ह न्युज

28 March 2023

राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल सरपंच शिवाजी तुपारे यांचा सत्कार

सत्कार प्रसंगी शिवाजी तुपारे

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

        मजरे कारवे (ता. चंदगड) येथील सरपंच शिवाजी तुपारे यांनी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, निर्मलग्राम तसेच हागणदारीमुक्त गाव करण्यासाठी घेतलेल्या परिश्रमाची दखल घेऊन शिवडाव (ता. भुदरगड ) येथील सावित्री चाॅरिटेबल ट्रस्टने राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्काराने माजी आमदार बजरंग देसाई यांच्या हस्ते सन्मानित केले. याबद्दल नुकताच मजरे कारवे येथील फुलेनगर वासियांनी सरपंच शिवाजी तुपारे यांचा सत्कार केला. यावेळी अध्यक्षस्थानी माजी उपसभापती देवाप्पा बोकडे होते.

       प्रास्ताविक एम. एम. गावडे यांनी केले. त्यानंतर जी. पी. वरपे यांनी सरपंच शिवाजी तुपारे यांच्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी मजरे कारवे मधील फुलेनगर येथील महिलांनी तुपारे दाम्पत्याच्या सत्कार केला. यासाठी पी. वाय. बोकडे, मधुकर तेजम, चंद्रकांत पाटील यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला उपसरपंच पांडुरंग बेनके, माजी उपसरपंच निवृत्ती हारकरे, कांचन पाटील, प्रियांका शिंदे, सुजाता कांबळे, संजिवनी पाटील यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

No comments:

Post a Comment