बुक्कीहाळ ग्रामपंचायत तंटामुक्त अध्यक्षपद पाटील तर उपाध्यक्षपदी कडलगेकर यांची निवड - चंदगड लाईव्ह न्युज

24 September 2023

बुक्कीहाळ ग्रामपंचायत तंटामुक्त अध्यक्षपद पाटील तर उपाध्यक्षपदी कडलगेकर यांची निवड

 

मारुती गावडू पाटील

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

      बुक्कीहाळ बुद्रुक व बुक्कीहाळ  खुर्द (ता. चंदगड) येथील ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या तंटामुक्त कमिटीच्या अध्यक्षपदी मारुती गावडू पाटील (रा. बुक्कीहाळ बुद्रुक) यांची तर उपाध्यक्षपदी सुरेश सुबराव कडलगेकर (रा. बुक्कीहाळ खुर्द) यांची तर सचिव म्हणून राजू बसवाणी ढबळे (रा. बुक्कीहाळ बुद्रुक) यांची निवड करण्यात आली.

सुरेश सुबराव कडलगेकर

      यावेळी सरपंच ममता बच्चनटी, उपसरपंच जोतिबा बिर्जे होते. सूचक म्हणून तंटामुक्त कमिटीचे माजी अध्यक्ष परशराम कोकीतकर यांनी नावे सुचवली. यानंतर  ग्रामसभेने या निवडीला मान्यता दिली. 

राजू बसवाणी ढबळे

     आगामी काळात सर्व तंटे, समस्या समजंसपणे सोडवण्यासाठी प्रयत्न करत राहीन, असे नूतन तंटामुक्त अध्यक्ष मारुती पाटील यांनी सांगितले. यावेळी ग्रामसेवक रविराज चिलमे यांच्यासह गावकरी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment