राईस मिल फोडून ५० हजारांची रक्कम, महत्त्वाच्या मशिनरींची कागदपत्रे लंपास, भात प्रक्रिया उद्योजकाला फटका - चंदगड लाईव्ह न्युज

24 September 2023

राईस मिल फोडून ५० हजारांची रक्कम, महत्त्वाच्या मशिनरींची कागदपत्रे लंपास, भात प्रक्रिया उद्योजकाला फटका

चोरट्यांनी फोडलेले कपाट

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा 

         पाटणे फाटा (ता. चंदगड) येथून जवळ असलेल्या हलकर्णी औद्योगिक वसाहती मधील नागणवाडी (ता. चंदगड) येथील भात प्रक्रिया उद्योजक राजू व्हटकर यांच्या मालकीच्या हरीलक्ष्मी ऍग्रो प्रॉडक्ट राईस मिलमधून ५० हजारांची रक्कम तसेच प्रक्रिया करण्यासाठी असणाऱ्या महत्त्वाच्या मशिनरींची खरेदी कागदपत्रे, कामगार हजेरी बुक, आवक जावक नोंदी असलेले रजिस्टर अशी सर्व कागदपत्रे चोरट्याने लंपास केली आहेत. 

        याबाबतची तक्रार राजू हरीश व्हटकर यांनी चंदगड पोलिसात  केली आहे. शनिवारी दिनांक २२ रोजी मध्यरात्रीनंतर व रविवार  दि. २३ रोजी पहाटे या दरम्यान सदर प्रकार घडल्याचा संशय आहे. चोरट्याने प्रथम जवळ असणाऱ्या डीपी मधून वीज पुरवठा खंडित केला आहे. यानंतर सीसीटीव्ही बंद करून चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. घटनेची नोंद चंदगड पोलिसात झाली असून अधिक तपास चंदगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेखर बारामती, राज किल्लेदार करत आहेत.

No comments:

Post a Comment