चंदगड / प्रतिनिधी
तुर्केवाडी (ता. चंदगड) येथील महादेवराव वांद्रे कॉलेज मध्ये बी. एड. प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ संपन्न झाला. संस्थाधक्ष महादेव वांद्रे अध्यक्षस्थानी होते.
प्रारंभी प्रास्ताविक सोनाली वळतकर यांनी केले. यावेळी प्रा. ग. गो. प्रधान यांनी बी. एड. प्रशिक्षणामुळे विविध कलागुणांच्या विकसनाबरोबरच एक चांगला माणूस बनविण्यासाठी सकारात्मक ऊर्जा निर्माण होते असे प्रतिपादन केले. तर प्रभारी प्राचार्य एन. जे. कांबळे यांनी नवागतांचे स्वागत करत मार्गदर्शन केले. बदलत्या माहिती तंत्रज्ञानामुळे सृजनशील व समाजाभिमुख शिक्षकांची आज गरज असल्याचे अधोरेखित केले. अध्यक्षस्थानी भाषणात महादेव वांद्रे यांनी संस्थेच्या वतीने सर्वाचे स्वागत करून पदवी अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्याना शुभेच्छा दिल्या. बी. एड. द्वितीय वर्षातील प्रशिक्षणार्थी तेजस्विनी कांबळे, मोहन चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केली.
संचालिका सौ. मृणालिनी वांद्रे, फार्मसी विभागाचे प्राचार्य डॉ. एम. बी. महातेश, पॉलिटेक्निक प्राचार्य एस. पी. गावडे, कार्यालयीन अध्यक्षिका श्रीमती एस. आर. देशपांडे, व्ही. ए. सबनीस, शितल देसाई, वैभव पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयुरी कांडर व सुलोचना भोगण यांनी केले. आभार विद्या पाटील यांनी मानले.
No comments:
Post a Comment