अलबादेवी (ता. चंदगड) येथे लीना लोबो यांचे स्वागत करताना ग्रा प सदस्या समीक्षा इंगवले सोबत सरपंच सौ. लक्ष्मी घोळसे व इतर सदस्या |
चंदगड / प्रतिनिधी
अलबादेवी (ता. चंदगड) येथे अल्लूबाई ग्रामसंघ यांच्या माध्यमातून महिला बचत गटाचा मेळावा उत्साहात संपन्न झाला. अध्यक्षस्थानी सरपंच सौ. लक्ष्मी घोळसे होत्या. प्रारंंभी सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत नेवगे यांनी स्वागत व प्रास्ताविक करून मेळाव्याचा हेतू स्पष्ट केला.
यावेळी सौ. लीना लोबो (किणी) यांनी मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की, गेल्या वर्षभरापूर्वी बचत गटांची स्थापना करून सर्व बचत गट एकत्र करून ग्रामसंघ तयार केला गेला. अल्पावधीतच राज्य शासनाकडून गावातील बचत गटांना अल्प प्रमाणात कर्ज पुरवठा केला असून त्यांचा उपयोग महिलांनी आपल्या उन्नतीसाठी करावा असे सौ. लोबो यांनी व्यक्त केले.
यावेळी अंगणवाडी सेविका सुधा डांगे, सुनीता पाटील, लतिका गोळसे, समीक्षा इंगवले यांनीही मनोगते व्यक्त केली. ग्रामसंघाच्या अध्यक्ष रेखा पाटील, शुभांगी पाटील आदीषह महिला उपस्थित होत्या.
No comments:
Post a Comment