चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
शारदा शिक्षण प्रसारक मंडळ यशवंतनगर संचलित धनंजय विद्यालय व ज्युनिअर कॉलेज नागनवाडी (ता. चंदगड) येथील दहावी बॅच 2001-2002 च्या विद्यार्थी विद्यार्थिनी नी 22 वर्षानंतर एकत्र येत शिक्षकांसमवेत संपन्न स्नेहमेळाव्यात जुन्या आठवणींना उजाळा दिला.
तत्कालीन गुरुजन आणि शिपाई ह्यांचे शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन कृतज्ञता व्यक्त केली. सर्व वर्गमित्र मैत्रिणींनी आपल्या शालेय जीवनातील घटना, अनुभव तसेच सद्यःस्थितीत आपण काय करत आहोत याबद्दलच्या भावना आपल्या मनोगतातून व्यक्त केल्या. शाळेतील अनुभव व सध्याच्या जीवनाचा संगम साधत गुरुजनांनी आपले विचार मांडले.
यावेळी एस. के. बांदिवडेकर, एस. एम. पाटील, एस. के. हरेर, एस. एल. पाटील, डी. डी. पाटील, आय. डी. मुल्ला, शिपाई वसंत कांबळे, तानाजी गावडे, विठ्ठल गावडे, नामदेव गावडे, सुनील गावडे आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. दहावी 'अ' वर्गातील जवळपास 40 मुला-मुलींनी एकत्र येऊन आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वांनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment