किटवाड शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी शंकर पाटील यांची निवड - चंदगड लाईव्ह न्युज

08 July 2024

किटवाड शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी शंकर पाटील यांची निवड

 

शंकर पाटील

प्रियांका सटुप्पा पाटील

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

    जिल्हा परिषद विद्यामंदिर किटवाड (ता. चंदगड) येथील शाळा व्यवस्थापन समितीचे नुकतेच पुनर्गठण करण्यात आले. शाळा व्यवस्थापन समिती  अध्यक्षपदी शंकर बाळू पाटील व उपाध्यक्षपदी प्रियांका सटुप्पा पाटील यांची  नुकत्याच झालेल्या पालक मेळाव्यात सर्वानुमते निवड करण्यात आली.

      नुतन अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा मुख्याध्यापक जानबा  अस्वले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच मंथन व ऋणानुबंध परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांना ज्येष्ठ नागरिक नरसू  मारुती पाटील यांनी वह्या बक्षीस देऊन त्यांचे अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment