चंदगड : सी एल वृत्तसेवा
चंदगड तालुक्यातील गवसे (इलगेवाडी) येथील महिला शारदा गंगाराम इलगे, वय वर्षे ६५ ही घरी न सांगता निघून गेली होती. तिचा मृतदेह घटप्रभा नदीच्या कडेला इब्राहिमपूर (ता. चंदगड) गावाच्या हद्दीत आढळला. याबाबतची वर्दी मयता महिलेचा चुलत पुतण्या मोहन परशराम इलगे (रा. गवसे-इलगेवाडी) यांनी चंदगड पोलिसात दिली.
या घटनेबाबत पोलिसांनी मिळालेली अधिक माहिती अशी, शारदा हिचे गेल्या वर्षभरापासून मानसिक संतुलन बिघडले होते. त्या अवस्थेत ती घटप्रभा नदी पात्रात पडली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तिचा मृतदेह दिनांक १७/९/२०२४ रोजी सकाळी ८ ते दुपारी साडेतीन दरम्यान घटप्रभा नदीच्या पाण्यात तरंगताना आढळला. या घटनेची आकस्मिक मयत म्हणून चंदगड पोलिसात नोंद झाली असून भारतीय दंड विधान संहिता १९४ प्रमाणे पुढील तपास पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या आदेशानुसार पोलीस हेडकॉन्स्टेबल श्री. देसाई हे करत आहेत.
No comments:
Post a Comment