'वर्दीचा राजा' ताडदेव (मुंबई) पोलीस वसाहतीत मुख्यमंत्री व पर्यावरण मंत्र्यांची हजेरी - चंदगड लाईव्ह न्युज

17 September 2024

'वर्दीचा राजा' ताडदेव (मुंबई) पोलीस वसाहतीत मुख्यमंत्री व पर्यावरण मंत्र्यांची हजेरी

  

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत करताना वर्दीचा राजा गणपती उत्सव मंडळाचे माजी अध्यक्ष पांडुरंग चौगुले व कार्यकर्ते.

गडहिंग्लज : सी एल वृत्तसेवा

       ताडदेव पोलीस वसाहतीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा 'वर्दीचा राजा' या गणपतीच्या दर्शनासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे तसेच पर्यावरण मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी वेगवेगळ्या वेळी भेट दिली. दोन्ही मंत्री महोदय यांचे स्वागत मंडळाचे माजी अध्यक्ष व सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग चौगुले मामा यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन केले. यावेळी ताडदेव पोलीस वसाहतीतील गणेशोत्सव मंडळाचे विद्यमान अध्यक्ष रुपेश पांडुरंग चौगुले उर्फ बंटी व सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी दोन्ही मंत्र्यांनी मंडळाचे पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्त्यांना गणपती उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment