विधानपरिषदेवर भाजपने राज्यपाल नियुक्त सदस्यांतून भरमुअण्णाची नियुक्ती करावी - बसर्गे येथे कार्यकर्त्यांची बैठकीत मागणी, प्रसंगी भरमुआण्णाना विधानसभेसाठी उभे करू - शिवाजीराव पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

17 September 2024

विधानपरिषदेवर भाजपने राज्यपाल नियुक्त सदस्यांतून भरमुअण्णाची नियुक्ती करावी - बसर्गे येथे कार्यकर्त्यांची बैठकीत मागणी, प्रसंगी भरमुआण्णाना विधानसभेसाठी उभे करू - शिवाजीराव पाटील

 


चंदगड / प्रतिनिधी

          महाराष्ट्र राज्यात राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची नियुक्ती होणार आहे.या बारा आमदारांमध्ये भाजप कोट्यातून भरमुअण्णांची विधानपरिषदेवर नियुक्ती करावी अशी मागणी आज चंदगड तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांनी केली. बसर्गे (ता. चंदगड) येथे घेतलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत ही जोरदार मागणी केली. अध्यक्षस्थानी भाजपा तालुकाध्यक्ष शांताराम पाटील होते. प्रारंभी प्रास्ताविक उदयकुमार देशपांडे यांनी करून बैठकीचा उद्देश स्पष्ट केला.

      यावेळी भरमुआण्णाना भाजप कोट्यातून विधानपरिषदेवर नियुक्त करावे असा एकमुखी ठराव करण्यात आला.यावेळी बोलताना भाजपाचे चंदगड विधानसभा निवडणूक प्रचार प्रमुख शिवाजीराव पाटील यांनी भरमुअण्णा मुळेच २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत विजयापर्यंत पोहचलो. अशा अनुभवी माणसाचे पाठबळ मला मिळाले, हे ऋण कदापी विसरणार नाही. आज मी जे काय आहे ते भरमुअण्णा मुळे आहे. कुटुंब म्हणून आम्ही सर्वजण मुंबईला जाऊ, उपमुख्यमंत्री फडणवीस व भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या गाठीभेटी घालून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. महामंडळाच्या नियुक्त्या लवकरच होतील. त्यातही प्रयत्न करणार आहे.यात मला यश नाही आलं तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आण्णा तुम्ही लढा पूर्ण ताकदीनं मी तुमच्यासाठी प्रयत्न करिन व तुम्हाला विधानसभेत पाठवीन असे सांगितले. यावेळी लक्ष्मण कडोलकर यानी राजकारणातील पी एच डी मिळविलेला आमचा नेता भरमुआण्णा आहे. त्याना ही संधी मिळाली तर तालुक्याच सोनं होईल.माजी जि. प. सदस्य  सचिन बल्लाळ यांनी माणसं असतील तर पक्ष असतो.``

       संघटना वाढीसाठी पदाची आवश्यकता असते. आमची मागणी पक्षाने मान्य करावी, असे सांगितले. तर यावेळी भाजप तालुकाध्यक्ष शांताराम पाटील यानीभरमुअण्णा यांना राज्यपाल नियुक्त आमदारातून भाजप च्या कोट्यातून विधानपरिषदेवर संधी मिळावी असा ठराव मांडला त्याला हात उंचावून सर्वानी या ठरावाला पाठिंबा व्यक्त केला.यावेळी महादेव बाणेकर, नाना डसके, मायाप्पा पाटील, नंदु गावडे नांदवडे, आर जी पाटील, बी के पाटील, तेजम सर, बाबू कोळसुंदकर, यशवंत सोनार, सुरेश सातवणेकर, अनिल शिवणगेकर, गणपत कनगुटकर,ईश्वर कांबळे,अशोक कदम यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.यावेळी माजी सभापती ज्योतीताई पाटील, गोकुळचे माजी संचालक दीपक पाटील,माजी सभापती बबनराव देसाई,विठाबाई मुरकुटे,मोहन परब, शहाबुद्दीन नाईकवाडी,रवी बांदिवडेकर,राणबा ढेरे,शामराव बेनके,संदीप बेनके,आप्पा वांद्रे, निस्सार शेख, मारुती पट्टेकर,भावकू गुरव,नामदेव पाटील, डाॅ.नामदेव कुट्रे आदीसह  कार्यकर्ते उपस्थित होते.सूत्रसंचालन बसवंत चिगरे यांनी केले,तर आभार प्रताप सुर्यवंशी यांनी मानले.

माजी.आम.कै.व्ही.के.चव्हाण-पाटील विधानपरिषद चे आमदार झाले होते.आणि कै. व्ही बी पाटील हे अपक्ष आमदार झाले हा तालुक्याचा इतिहास आहे.याची आठवण माजी मंत्री भरमूआण्णा पाटील यांनी यावेळी सांगितली.


No comments:

Post a Comment