सदिच्छा कार्यक्रमांची गर्दीच बोकडे यांच्या कार्याची पोचपावती, आमदार राजेश पाटील, तुरमुरी येथे एन. एम. बोकडे यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार - चंदगड लाईव्ह न्युज

17 September 2024

सदिच्छा कार्यक्रमांची गर्दीच बोकडे यांच्या कार्याची पोचपावती, आमदार राजेश पाटील, तुरमुरी येथे एन. एम. बोकडे यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार



चंदगड : सी एल वृलसेवा
       आजच्या सदिच्छा समारंभाला जी मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली आहे, हेच बोकडे सरांच्या कार्याची खऱ्या अर्थाने पोचपावती आहे. जी व्यक्ती वीस वर्षे पगाराविना काम करत असताना देखील चेहऱ्यावर याचा जरा सुद्धा लवलेश न दाखवता उत्साहाने काम करणाराच खरा शिक्षक, गुरु म्हणावा लागेल. विद्यार्थी, विद्यार्थिनींची यासह नागरिकांची जी उपस्थिती पाहता हेच बोकडे सरांच्या सेवेचे खरे फलित आहे, असे मनोगत चंदगडचे आमदार राजेश पाटील यांनी व्यक्त केले.
तुरमुरी येथील अमरज्योत शिक्षण सेवा मंडळ संचलित, रामलिंग हायस्कूल मधील सेवानिवृत्त आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते  एन. एम. बोकडे यांच्या 36 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्ती निमित्त त्यांचा सदिच्छा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. तूरमुरी ग्रामपंचायतचे माजी अध्यक्ष विद्यमान सदस्य सुरेश राजूकर अध्यक्षस्थानी होते.
अमरज्योत शिक्षण सेवा मंडळ उचगाव, शाळा सुधारणा कमिटी, रामलिंग हायस्कूल, ग्रामपंचायत, गावातील सर्व सहकारी सोसायट्या, दूध संस्था, युवक मंडळे, प्राथमिक मराठी शाळा, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या सदिच्छा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला संस्थेची सेक्रेटरी जवाहर देसाई , एम. एम. गावडे, नागनाथ जाधव, एन.ओ चौगुले, चांगदेव बेळगावकर ,रघुनाथ खांडेकर, मारुती बेनके, लक्ष्मण तुडयेकर, एल पी देसाई, एस पी हलगेकर ,पी एल सोमनाथ, पी.एम बेळगावकर ,बाळू अष्टेकर ,अशोक बांडगे ,गुंडू गुंजकर ,मारुती बेळगुदकर ,मल्लाप्पा तंगणकर, ईराप्पा खांडेकर ,एल आर मासेकर, शिवाजी खांडेकर, नागेंद्र बेळगावकर ,पी.एम पन्हाळकर उपस्थित होते.
प्रारंभी रामलिंग हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रकाश चलवेटकर यांनी प्रास्ताविक करून या सदिच्छा समारंभाचा थोडक्यात आढावा घेतला. तर ए.आर.पाटील यांनी बोकडे यांचा परिचय करून दिला. यावेळी सरस्वती फोटोंचे पूजन जवाहर देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. दीपप्रज्वलन  देवाप्पा बोकडे , एम एम गावडे, शिवाजी तुपारे व अन्य मान्यवर मंडळीच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सत्कारमूर्ती एन. एम. बोकडे व निता बोकडे या दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी बेळगाव तालुक्यातून तसेच चंदगड तालुक्यातून आलेल्या अनेक विविध संस्था,  मान्यवरांनी त्यांचा सत्कार केला.
यावेळी माझी विद्यार्थी लक्ष्मण बांडगे, महेश पाटील, मष्णू डोंबले ,केदारी गुंजीकर , यल्लाप्पा कांबळे ,सतीश बोकडे, जयंत पाटील, कृष्णाताई बांडगे यांनी बोकडे यांच्या विषयी आदरभाव व्यक्त करणारी आपली मनोगते व्यक्त केली. तसेच उपस्थित अनेक मान्यवरांनी बोकडे सरांच्या बालपण, शैक्षणिक बद्दलच्या अनेक जुन्या आठवणी सांगितल्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील बेळगुंदकर व केदारी गुंजीकर यांनी केले. तर आभार एम. टी बेळगावकर यांनी मानले.

No comments:

Post a Comment