शाहू स्मारक भवन येथे येत्या विधानसभा निवडणुकीत मराठा आरक्षण मोर्चाच्या वतीने इच्छुक उमेदवारांचे प्रस्ताव घेताना शहाजी देसाई व मान्यवर
कोल्हापूर : सी एल वृत्तसेवा
गेल्या आठवड्यात शिरोळ येथे संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या सुचनेनुसार सकल मराठा समाजाची बैठक झाली होती. त्या बैठकीतील निर्णयानुसार आठ दिवसात विविध व्हाट्सअप ग्रुपवर मेसेज पाठवले होते. त्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यास पूर्व नियोजन म्हणून संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदार संघातील उमेदवारiच्या निवडीसाठीच्या बैठकीसाठी सकल मराठा समाजातील इच्छुकiनी येण्याचे आव्हान केले होते.
त्याप्रमाणे काल शाहू स्मारक भवन कोल्हापूर येथे जिल्ह्यातील सर्व दहा विधानसभा मतदार संघातील इच्छुक उमेदवारांचे प्रस्ताव घेण्यात आले. त्यामध्ये १० पैकी ८ मतदार संघातील उमेदवारiनी प्रस्ताव सादर केले. उर्वरित दोन मतदार संघातील उमेदवारांनी दूरध्वनी वरून संपर्क साधला. लवकरच ते आपले प्रस्ताव घेऊन समन्व्यक यांची भेट घेतील.
दोन दिवसात जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात लोकांना संपर्कासाठी सकल मराठा कार्यालयाचे उदघाटन करण्यात येणार आहे. तसेच मा. जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन खोळंबलेल्या कुणबी दाखले व इतर समस्यांवर चर्चा करणार आहोत. अशी माहिती मराठा सेवा संघाचे जिल्हा प्रवक्ता शहाजी देसाई यांनी सी एल न्यूज ला दिली.
कालची संपूर्ण प्रक्रिया समन्व्यक महिपती बाबर, हणमंत पाटील, शहाजी देसाई, प्रशांत कुट्रे, निलेश चव्हाण, भगवान कोईंगडे, डॉ राजीव चव्हाण, शाबाज शेख, नंदकुमार नाईक, प्रवीण कदम, सुधाकर देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. अजूनही कुणाला प्रस्ताव दयायचे असल्यास समन्व्यकांशी भेट घेण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.
लवकरच उच्छुक उमेदवारांसह मनोजदादा जरांगे पाटील यांची संघर्ष भूमी अंतरवाली सराटी पण येथे भेट घेण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment