पुरस्कार स्विकारताना प्रकाश ऐनापुरे
चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांसाठी कै. बसवंत नागू शिंगाडे सामाजिक सेवाभावी संस्थेकडून राष्ट्रीय प्रेरणा गौरव पुरस्कार वितरण १५ सटेंबर रोजी कोल्हापूर येथे संपन्न झाला. यंदाचा आदर्श पत्रकारितेचा पुरस्कार दैनिक महानकार्यचे चंदगड तालुका प्रतिनिधी प्रकाश ऐनापुरे यांना व शुभांगी लक्ष्मण पाटील (आरोग्य सेविका माणगांव प्राथमिक आरोग्य केंद्र) यांना जाहीर झाला. सामाजिक प्रेरणा गौरव पुरस्कार वितरण तृप्ती देसाई व निवृत न्यायाधीश श्री. कुलकर्णी यांच्या हस्ते देण्यात आले. दुपारी १ वाजता ऍट्रीया हाॅल, स्टेशन रोड, ताराबाई पार्क जवळ, टनाटन हाँटेल, कोल्हापूर येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.
या पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तृप्ती देसाई स्वागत व प्रास्ताविक डॉ. विक्रम शिंगाडे यांनी केले. अनेक मान्यवरांचे मनोगत व्यक्त केले. यासह इतर विविध पुरस्कार ही मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले. कार्यक्रमाला उपस्थित प्रकाश कदम, जालंदर महाडिक, निवृत न्यायधिश पुणे श्री. कुलकर्णी', प्रा. पी. डी. पाटील, गोपाळ चौगुले, दादासाहेब पाटील, डॉ. प्रतिभा कांबळे (सांगली), आनंद गानगीर ब्रम्हाकुमारी ताई ' महादेव नाईक या सह महाराष्ट्र कर्नाटक गोवा राज्यातील पुरस्कर्ते व मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment