तिलारी घाटातील धोकादायक अपघात ठिकाण असलेल्या जयकर पाॅईंट येथे दरीच्या तोंडावर खचलेल्या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी केली जात आहे. (छाया - तुळशीदास नाईक
चंदगड / प्रतिनिधी
गेल्या जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तिलारी घाटात धोकादायक अपघात केंद्र बिंदू असलेल्या जयकर पाॅईंट येथे दरीच्या तोंडावर रस्ता खचला आहे. यामुळे घाटातील वाहतूकीला अडथळा निर्माण होत आहे.चंदगड सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने तिलारी घाटातील रस्ता दुरुस्ती करण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी नागरिक व वाहन धारकांतून होत आहे.
गोवा, दोडामार्ग, बेळगाव, कोल्हापूर, पुणे, सातारा, हुबळी, असा जवळचा मार्ग असलेल्या तिलारी घाटात सुरू असलेल्या बेकायदेशीर अवजड वाहने यामुळे घाटातील रस्त्यावर पडलेला ताण यामुळे जुलै महिन्यात तिलारी घाटातील रस्ता धोकादायक अपघात ठिकाण अशी ओळख असलेल्या जयकर पाॅईंट येथे तीव्र चढाव उतार येथे दरीच्या तोंडावर खचला आहे. पावसाळ्यात याची दुरुस्ती करणे शक्य झाले नाही. तेव्हा सार्वजनिक बांधकाम विभाग चंदगड यांनी तातडीने दुरुस्ती कामाला सुरुवात करावी अशी मागणी केली जात आहे.तिलारी घाटातील वाढती अवजड वाहने वाढते अपघात यामुळे कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनी २१ जून ते ३१ आॅक्टोबर पर्यंत अवजड वाहने बंद केली यात एस टी बसेस बंद झाल्या यामुळे प्रवासी विद्यार्थी व्यापारी यांची वाट लागली आहे. गणेश चतुर्थी सणात गैरसोय झाली. रस्ता खचला यामुळे एस टी बसेस गणेश चतुर्थी सणात सुरू होऊ शकल्या नाही.
३१ ऑक्टोबर नंतर तिलारी घाटातील बंद केलेल्या एस टी बसेस पुन्हा सुरू होण्याचे संकेत आहेत. तेव्हा सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी खचलेल्या तिलारी घाटातील रस्ता दुरुस्ती आॅक्टोबर पूर्वी पूर्ण करावी अशी मागणी होत आहे. खचलेल्या रस्त्यामुळे काही वाहन धारकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. समोर वाहन आले तर बाजू मिळत नाही शिवाय तीव्र उतार यावेळी ब्रेक लागला नाही तर अपघात होण्याची शक्यता तेव्हा तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी केली जात आहे.
No comments:
Post a Comment