श्रीकांत पाटील / सी एल वृत्तसेवा
माऊंट आबू : प्रजापिता ब्रम्हकुमारी विश्वविद्यालयाद्वारे आयोजीत राष्ट्रिय स्तरावरील अखिल भारतिय पत्रकार महासंमेलनाला गेलेल्या कारंजेकर व वाशिम जिल्ह्यातील पत्रकारांनी दि. 26 ते 30 सप्टेंबर 2024 पर्यंत मनमुराद आनंद लुटला.आपल्या अनुभव कथनामध्ये विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी सांगितले. माऊंट आबू येथील आमचे राष्ट्रिय पत्रकार महासंमेलन अतिशय दिव्य अनुभूती, अद्भुत, अविश्वसनीय, दिर्घानुभव, असे पार पडून येथे आलेल्या पत्रकारांना,कानावर विश्वास ठेवण्यापेक्षा प्रत्यक्ष डोळ्यांवर विश्वास ठेऊन, सत्य व न्याय्य बातम्या देण्याचा तसेच फेकन्यूज व अवैध बातम्याचा मोह सोडण्याचा उपदेश मिळाला.
पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून, समाजातील केवळ एकमात्र पत्रकारामध्ये, जगत्कल्याणासाठी स्वस्थ व आध्यात्मिक सशक्तीकरण घडविण्याची क्षमता असल्याचा अनमोल संदेश मिळाला. सदर महासंमेलनाला महाराष्ट्र, हरियाण, गोवा,दिव दमण, अंदमानसह नेपाळ देशामधून तिन हजार पत्रकारांची उपस्थिती होती.असो,माऊंट आबू येथे पोहोचताच आम्हा पत्रकारांना घेण्यासाठी, ब्रम्हकुमारीज मुख्यालयातर्फे आबू रोड रेल्वे स्टेशनला लक्झरी बस पोहोचली. बसमध्ये आम्ही चढून महासंमेलनासाठी मुख्यालयाच्या आनंद सरोवर परिसरात पोहचताच,स्वागत कक्षामध्ये राष्ट्रीय पत्रकारिता महासंमेलनाचे विशेष ओळखपत्र देण्यात आले. त्यानंतर ज्ञानसरिता या सहामजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्या वरील सर्व सोईसुविधायुक्त असा व्हिआयपी फ्लॅट उपलब्ध करून देण्यात आला.त्यानंतर प्रभूमिलन इमारती मध्ये चहा-कॉफी-दूध व्यवस्था करण्यात आली. स्वयंसेवेवर आधारीत ही व्यवस्था प्रात:काली सकाळी 03:30 ते 07: 00 पर्यंत आणि दुपारी 03:00 ते 06:00 पर्यंत असते. तसेच सकाळच्या अल्पोपहाराची व्यवस्था सकाळी 08:00 ते 10:00 पर्यंत असते. अल्पोपहारामध्ये धपाटे,पुरी, वरण,भाजी, पोहे, शिरा, उपमा, इडली,शेवळ्या,मसालेभात इत्यादी पैकी काही पदार्थ दर दिवशी बदलून मिळतात.तर दुपारी 12 : 00 ते 02:00 आणि रात्री 07:00 ते 10:00 पर्यंत ब्रम्हा भोजन दिले जाते.येथील जेवण तिन प्रकारचे असते. 1) सर्वसाधारण भाई बहिणी करीता भोजन 2) फिके खाणाऱ्या करीता भोजन 3) आजारी व्यक्तीकरीता भोजण.भोजनाची व्यवस्था आनंद सरोवरा मध्ये १) ब्रम्हा भोजन डायनिंग हॉल (दिव्य अनुभूती हॉल जवळ) आणि प्रभू मिलन डायनिंग हॉल तसेच शांती सरोवर येथे यात्री भोजन निवास दोन मजली भव्य डायनिंग हॉल येथे केलेली होती.एका वेळेस जवळ जवळ 30,000 व्यक्ती भोजन घेत असलेले आढळून आले.
भोजनामध्ये मिक्सभाजी,दाळी, कढी किंवा ताक, खिचडी किंवा साधा भात,खिर, शिरा,जिलेबी,पालपुरी,पुरी, चपाती,सलाद,मोड आलेली कडधान्ये आदी पदार्थ वाढले जात होते. येथील भोजन सौर ऊर्जेवर निर्मित वाफेवर शिजवलेले अन्न पदार्थ होते.परिसरात भव्य व दिव्य अशा सुशोभित इमारती,चकचकीत सडकमार्ग,ठिकठिकाणी विश्रामाकरीता बाकडे आणि बंगई ठेवलेल्या होत्या.संपूर्ण परिसरात हिरवीगार फळाफुलांची झाडे,पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था, सकाळ सायंकाळ पिण्याकरीता दूध, दही,ताक आणि पारदर्शक स्वच्छता दिसून येत होती. ब्रम्हकुमार,ब्रम्हकुमारी,सेवाधारी व्यक्ती पांढऱ्या शुभ्र पेहरावात वावरतांना दिसून येत होते. परिसरातील निवासी व्यक्ति करीता प्रातःकाली राजयोग शिबीर आणि मुरली असते. येथे वावरणाऱ्या व्यक्ती सुखी, समाधानी,आनंदी,निर्व्यसनी, पवित्र आणि सर्वार्थाने चिंतामुक्त असल्याच्या दिसून येत असल्याने प्रत्येकाच्या चेहऱ्या वरून पवित्रता,स्मित हास्य व आनंदाची अनुभूती येत होती. येथे कुणीच कुणाला कोणत्याही गोष्टीबद्दल ब्र शब्दानेही दुखवीत नसल्याची मी नोंद घेतली. विशेष बाब म्हणजे येथील यात्रेकरू व्यक्तीला परिसरात एक रुपयाही खर्च करण्याची गरज पडत नाही. चहा कॉफी भोजन व निवास व्यवस्था सर्वकाही विनामुल्य आहे.
आजारी व्यक्ती करीता रुग्नालयाची व्हिआयपी व्यवस्था, परिसर पाहणाऱ्यासाठी विनामुल्य वाहनाची व्यवस्था दिसून येत होती.येथे पत्रकारीता महासंमेलनामध्ये संपूर्ण पाच दिवस पर्यंत ब्रम्हकुमारी आणि प्रमुख पाहुणे व उपस्थित वक्ते यांच्या कडून खूप काही शिकायला अनुभवाला मिळाले. पहिल्या दिवशी सर्व पत्रकारांचा स्वागत समारोह व अखेरच्या दिवशी सहभागी आम्हा पत्रकारांचा संवाद व अनुभव कथन कार्यक्रम पार पडला. यावेळी पत्रकार महासंमेलनाला राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या कडून शुभेच्छा मिळाल्या तर भारत सरकारच्या सूचना प्रसारण केन्द्रीय मंत्री मुरुगन यांचे मार्गदर्शन मिळाले.आपल्या मार्गदर्शनात त्यांनी विश्वासपात्र असलेल्या प्रिन्ट मिडीयाची वाहवा करीत,प्रिन्ट मिडीयाला (दैनिक / साप्ताहिकाला) विशेषाधिकार व विशेष दर्जा देणार असल्याचे आश्वासित केले." अनेक पत्रकारासह वाशिम जिल्ह्याचे ज्येष्ठ पत्रकार प्रा. अशोकराव उपाध्ये, महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सदस्य संजय कडोळे,नांदेडचे मनोज काठोळे, अमरावती जिल्हाचे संपादक उमाकाठ*संतोष अग्रवाल*आदींनी पत्रकारांच्या हितासाठी आपल्या लक्ष्यवेधी मागण्या मांडल्या.कार्यक्रमाला उपस्थित प्रत्येक ब्रम्हकुमारी ह्या ओम शांती उच्चारणाने, पवित्र, कोमल, शांती व संयमाने आपल्या मार्गदर्शनामधून जणू काही शब्दांच्या हिरे मोत्यांची उधळण करीत असल्याचा भास होत होता.
सदर कार्यक्रमासाठी ब्रम्हकुमारीजच्या सर्व ब्र.कु. डॉ दादी रतन मोहिनी दिदी मोहिनी दिदी, डॉ नलिनी दिदी, डॉ सविता दिदी, डॉ निकिता दिदी, डॉ . लक्ष्मी दिदी, डॉ सुषमा दिदी, दिना दिदी, शैला दिदी, सरला दिदी, रंजनदिदी, नंदिनी दिदी, हुसैन दिदी, चंद्रकला दिदी, चंदा दिदी ,भावना दिदी, अनिता दिदी, योगीनी दिदी, प्रियदर्शिनी राहुल दिदी, डॉ सारिका ठक्कर, विनीता दिदी, विजया दिदी, सुनिता दिदी, मंजुल दिदी, गीता दिदी इत्यादीसह अनेक बांधवानी मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे म्हणून केन्द्रिय सूचना प्रसारण मंत्री मरुगन, राजस्थान व गुजरात मंत्रीमंडळातील अनेक मंत्री, दूरदर्शन,आकाशवाणी व राष्ट्रिय स्तरावरील संपादक,पत्रकार उपस्थित होते.तर हेड ऑफ चिफ ब्रम्हाकुमाराजच्या मार्गदर्शनात पत्रकारीता महासंमेलनाचे आयोजन ब्रम्हकुमारीज विंग मिडीयाचे शांतनू भाई यांनी केले होते. दररोज सायंकाळी पत्रकाराच्या मनोरंजना करीता संपूर्ण भारतभरातून आलेल्या विविध लोककलावंतानी सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी दिली." असे आमचे प्रतिनिधी संजय कडोळे यांनी सांगितले.नारीशक्ती ब्रम्हाकुमारीजच्या या यशस्वी आयोजनाने सर्व उपस्थित पत्रकारांची दररोजच्या ताणतणावातून काही काळ मुक्तता होऊन त्यांना प्रसन्नतेचा आगळा वेगळा आनंद मिळाला. उर्वरीत वेळेत पत्रकारांनी पाण्डव भवन,शांतीबन,मधुबन, ज्ञानसरोवर,नक्की झिल,गुरु शिखर,पि एम पार्क, भिलवाडा जैन मंदिर इत्यादी ठिकाणी पर्यटन व खरेदीचा आनंद घेतला.
कार्यक्रमाला वाशिम-अकोला जिल्ह्यामधून प्रा.अशोकराव उपाध्ये, प्रा.शंकरराव पुंड,संजय कडोळे,विजय खंडार,प्रदिप वानखडे, संजय गावंडे, ओमप्रकाश गुप्ता,गजानन हरणे , सुधाकर इंगोले, संतोष अग्रवाल,लोमेश पाटील चौधरी आदी पत्रकार उपस्थित होते. वाशिम जिल्ह्याच्या सहभागी पत्रकारांनी प्रा.अशोकराव उपाध्ये यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रीयन गोंधळ गीते गायन व नृत्य तसेच मेरा बाबा ... या ब्रम्हाकुमारीजच्या हिंदी गीतावर नृत्य करीत खुशनुमा जिंदगीचा मनमुराद आनंद लुटला.
No comments:
Post a Comment