चंदगड : सी एल वृत्तसेवा
कडगाव (ता. भुदरगड) येथील शहाजी रामकृष्ण देसाई लिखित 'चला माणूस बनू' या ग्रंथाचे प्रकाशन रविवार दिनांक १६ मार्च २०२५ रोजी होत आहे. स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रमाता जिजाऊ अकॅडमी कडगाव येथे सायंकाळी ५ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत या ग्रंथाचे प्रकाशन होणार आहे.
मराठा सेवा संघाचे कोल्हापूर जिल्हा प्रवक्ता असलेल्या देसाई यांची यापूर्वी 'मी सावित्री बोलतेय' हा एक पात्री प्रयोग, समाज जोडणारा हळवा माणूस, पत्नी वंदना मुळेच मी आदी ४ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. यानंतर आता चला माणूस बनू या ग्रंथाचे प्रकाशन होत आहे. त्यांचा रूढी, प्रथा, परंपरा, संस्कृती यांवर प्रकाश टाकणारा 'धर्म आणि माणूस' हा ग्रंथ तसेच 'क्रांतीची मशाल' हा गीत संग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे.
परिवर्तनाच्या चळवळीत अग्रेसर असणारे कडगाव येथील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक शहाजी देसाई यांनी यापूर्वी शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष तसेच कोल्हापूर जिल्हा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख म्हणूनही उठावदार कार्य केले आहे. चला माणूस बनू या ग्रंथाच्या प्रकाशन प्रसंगी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन शहाजीराजे फाउंडेशन कडगाव यांच्यामार्फत करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment