माडखोलकर महाविद्यालयात हिंदी भाषा कौशल्य विकास व वर्तमान उपयोगिता या विषयावर कार्यशाळा संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

15 March 2025

माडखोलकर महाविद्यालयात हिंदी भाषा कौशल्य विकास व वर्तमान उपयोगिता या विषयावर कार्यशाळा संपन्न


चंदगड / सी एल वृत्तसेवा

 भाषेतील विविध रूपांची, वैशिष्ट्यांची  माहिती अतिशय जिज्ञासू पद्धतीने घेतल्यास संभाषण अधिक चांगल्या पद्धतीने होते. त्यासाठी विद्यार्थ्यांनी चौफेर वाचन करावे असे आवाहन न. भु. पाटील ज्युनिअर कॉलेजचे प्रा बाबासाहेब शिंगाडे यांनी केले.

 ते चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयातील हिंदी विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भाषा कौशल्य विकास व वर्तमान उपयोगिता या विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थानी रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. एम. एम. माने होते.

 प्रा. बाबासाहेब शिंगाडे आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, "भाषा हे प्रभावी संवाद कौशल्याचे माध्यम असून  भाषेत विविध प्रकारचा गोडवा असतो तो अनुभवण्यासाठी भाषेतील विविध कंगोरे लक्षात घेऊन चतुरस्त्र  पद्धतीने अध्यापन केल्यास आयुष्यात निश्चित यशस्वी होता येते त्यासाठी जाणीवपूर्वक विविध भाषा अवगत कराव्यात असे आवाहनही त्यांनी यावेळी बोलताना केले."

 प्रारंभी प्रास्ताविक हिंदी विभाग प्रमुख डॉ. संजय पाटील यांनी करून विभागामार्फत झालेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. यावेळी ते म्हणाले की, युवकांच्या व्यक्तिमत्त्वाला पैलू पाडण्याचे हेच वय असून वेळेचा सदुपयोग करून विद्यार्थ्यांनी आपले भाषा अभिव्यक्ती कौशल्य व लेखन कौशल्य विकसित करावे असे आवाहन केले.

 अध्यक्षीय भाषणात डॉ. माने यांनी भाषा ही वर्तमान काळाची मूलभूत गरज असून प्रत्येक विद्यार्थ्यांनी ती आत्मसात करण्यासाठी प्रयत्नशील राहावे असे आवाहन केले. यावेळी डॉ. रंजना कमलाकर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

 सूत्रसंचालन कु. कविता कट्टी हिने केले तर आभार पुनम गावडे यांनी मानले. या कार्यक्रमाला प्रा. बाबली गावडे, डॉ. एस. डी. गावडे, डॉ. जी. वाय. कांबळे, प्रा. ए. डी. कांबळे, डॉ. एस. एस. सावंत, डॉ. एन. के. पाटील, प्रा. व्ही. के. गावडे यांच्यासह  प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment