![]() |
गव्याच्या हल्यात जखमी झालेला रविंद्र पाटील |
तेऊरवाडी : सी एल वृत्तसेवा
शेतातील काजू गोळा करत असताना अचानक पाठीमागून आलेल्या गव्याने जोराची धडक दिल्याने अलबादेवी (ता. चंदगड ) येथील रविंद्र शंकर पाटील, वय २९ हा युवक गंभीर जखमी झाला.
या घटनेची अधिक माहिती अशी, रविंद्र हा अलबादेवी येथील चाळोबाची वारी या शेताकडे काजू बागेमध्ये काजू गोळा करण्यासाठी सकाळी गेला होता. बागेमध्ये काजू गोळा करत असताना अचानक झाडीतून पाठीमागून आलेल्या गव्याने रविंद्रला जोराची धडक दिली. पुन्हा जमिनिवर पडलेल्या रविंद्रला फरफटत नेले. रविंद्र मानेवर जोरात जमिनिवर पडल्याने मणक्याच्या हाडांना गंभीर दूखापत झाली आहे. या वेळी आरडाओरड केल्याने गवा रेडा जंगलात पळून गेला. काजू बागेच्या जवळपास असणाऱ्या लोकांनी रविंद्रला गडहिंग्लजला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. घरची परिस्थिती अंत्यंत हालाखिची असणारा रविंद्र हा एकुलता एक मूलगा आहे. गव्याच्या हल्यात तो गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर वैद्यकिय उपचारासाठी मदतीची गरज आहे. या घटनेचा रीतसर पंचनामा करून शासन व वन विभागाकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
No comments:
Post a Comment