दाटे केंद्राच्या केंद्रप्रमुख शोभाताई दत्तात्रय देसाई यांचा सेवानिवृत्ती निमित्त २६ रोजी गौरव समारंभ - चंदगड लाईव्ह न्युज

22 April 2025

दाटे केंद्राच्या केंद्रप्रमुख शोभाताई दत्तात्रय देसाई यांचा सेवानिवृत्ती निमित्त २६ रोजी गौरव समारंभ


चंदगड : सी एल वृत्तसेवा 
        चंदगड पंचायत समितीच्या दाटे केंद्राच्या केंद्रप्रमुख सौ. शोभाताई दत्तात्रय देसाई (उचगाव- बेळगाव) या आपल्या ३९ वर्षाच्या शैक्षणिक सेवेतून ३१ मे २०२५ रोजी निवृत्त होत आहेत. त्यांचा सेवानिवृत्ती गौरव सोहळा शनिवार दि. २६ एप्रिल २०२५ रोजी दुपारी बारा वाजता स्वराज्य मल्टीपर्पज हॉल मजरे कार्वे, ता. चंदगड येथे आयोजित करण्यात आला आहे. 
    प्राथमिक शिक्षक समितीचे चंदगड तालुका अध्यक्ष धनाजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमात माजी रोहयो मंत्री भरमूआण्णा पाटील व माजी पंचायत समिती उपसभापती मनीषा शिवनगेकर यांच्या हस्ते शोभा देसाई यांचा सत्कार होणार आहे. 
   यावेळी चंदगडचे गटशिक्षणाधिकारी वैभव पाटील, विस्तार अधिकारी सुमन सुभेदार, एन. व्ही. पाटील, जी. वाय कांबळे, माजी पंचायत समिती माजी सभापती शांताराम पाटील व यशवंत सोनार, माजी उपसभापती बबनराव देसाई, माजी जि प सदस्य कल्लाप्पाण्णा भोगण, शंकर मनवाडकर, वसंत जोशीलकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केंद्र मुख्याध्यापक व दाटे केंद्रातील सर्व शिक्षकांच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment