निट्टूर येथून बकरी चोरीला, ५० हजारांचे नुकसान - चंदगड लाईव्ह न्युज

22 April 2025

निट्टूर येथून बकरी चोरीला, ५० हजारांचे नुकसान

 


तेऊरवाडी /सी एल वृत्तसेवा 
       निट्टूर (ता. चंदगड) येथील शेतकरी शंकर तुकाराम पाटील यांची काल रात्री  अंदाजे ५० हजार रुपये किमतीची पाच बकरी अज्ञाताने लंपास केली. येथील शंकर पाटील यांचे खडीवर शेड आहे. या शेडमध्ये पाच बकरी पाळली होती. बकरी सांभाळत जोडधंदा म्हणून अत्यंत कष्टाने त्यांनी बकरी सांभाळली होती. पण काल रात्री अज्ञातांनी शेडचा दरवाजा उघडून आतील पाच बकरी लंपास केली. या परिसरातील असणाऱ्या तलावातील मोटारींची केबल चोरीचा छडा अद्याप लागला नाही. त्यातच बकरी चोरीची घटना घडल्याने या चोरांनी कोवाड पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे.

No comments:

Post a Comment