निवड पत्र स्वीकारताना सुजाता कुंभार
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
शिवसेना शिंदे गट प्रणित शिव उद्योग संघटनेच्या कोल्हापूर जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या विविध निवडी नुकत्याच करण्यात आल्या. कोल्हापूर येथे झालेल्या कार्यक्रमात शिव उद्योग संघटना अध्यक्ष दीपक विठ्ठल काळीद यांनी संबंधितांना निवड पत्रे प्रदान करून शुभेच्छा दिल्या. या कामी त्यांना उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे व पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख राजेंद्र भिलारे यांचे मार्गदर्शन लाभले. निवड पत्र प्रदान प्रसंगी संघटनेचे सरचिटणीस प्रकाश ओहळे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
![]() |
निवड पत्र स्वीकारताना विश्वास पाटील |
शिव उद्योग संघटना महिला रोजगार समिती प्रमुख पदी चंदगड तालुक्यातील राजगोळी खुर्द येथील सुजाता महेश कुंभार यांची निवड करण्यात आली आहे त्यांनी यापूर्वी महिला बचत गट तसेच राजगोळी व परिसरातील लाभार्थ्यांना पेन्शन मिळवून देण्यासाठी योगदान दिले आहे. याशिवाय निट्टूर येथील तरुण शेतकरी विश्वास लक्ष्मण पाटील यांची जिल्हा कृषी समिती प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. निवडी बद्दल दोघांचे अभिनंदन होत आहे.
यावेळी निवड झालेल्या अन्य पदाधिकाऱ्यांमध्ये कोल्हापूर जिल्हा महिला प्रमुख गीता जेधे, उपजिल्हाप्रमुख जयकुमार देसाई, जिल्हा संघटक महेशजी लाखे, इंद्रायणी बोकमुरकर महिला उप जिल्हाप्रमुख, मदन पाटील कोल्हापूर जिल्हा सचिव, नीलम धर्माधिकारी भोजन समिती प्रमुख, विनायक जितकर मीडिया समिती प्रमुख, नरसु शिंदे रोजगार समिती प्रमुख, कृष्णा बामणे आरोग्य समिती प्रमुख, अस्मिता देसाई शिक्षण समिती प्रमुख, सयाजी मारुती पाटील बँकिंग अँड फायनान्स प्रमुख, सावित्री तानाजी कल्याणकर आरोग्य समिती उपप्रमुख यांचा समावेश आहे.
No comments:
Post a Comment