एमएचटी- सीइटी, पीसीए परीक्षेत कालकुंद्री येथील राणा पृथ्वीराज पाटील याला 99.97% गुण - चंदगड लाईव्ह न्युज

17 June 2025

एमएचटी- सीइटी, पीसीए परीक्षेत कालकुंद्री येथील राणा पृथ्वीराज पाटील याला 99.97% गुण

  

राणा पृथ्वीराज पाटील

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा 

       राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी सेल) घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी परीक्षेतील पीसीएम (भौतिकशास्त्र रसायनशास्त्र व गणित) गटात कालकुंद्री (ता. चंदगड) येथील राणापृथ्वीराज गजानन पाटील यांने 99.97% गुण मिळवून कौतुकास्पद कामगिरी केली. इनोव्हेटिव्ह पब्लिक स्कूल बोरवडे जुनिअर कॉलेजचा विद्यार्थी असलेल्या राणापृथ्वीराज याला मुख्य मार्गदर्शक साठे व अन्य शिक्षकांचे मार्गदर्शन  तर कालकुंद्री येथील आई वडील व कुटुंबीयांचे प्रोत्साहन लाभले. त्याच्या या यशाबद्दल शैक्षणिक क्षेत्रातून कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment