आप्पासाहेब गायकवाड हायस्कूल मध्ये नवगतांचे स्वागत - चंदगड लाईव्ह न्युज

17 June 2025

आप्पासाहेब गायकवाड हायस्कूल मध्ये नवगतांचे स्वागत

 


आजरा: गोपाळ गडकरी / सी. एल. न्यूज

      महागोंड (ता. आजरा) येथील सह्याद्री शिक्षण संस्था संचलीत आप्पासाहेब गायकवाड हायस्कूल, महागोंड या प्रशालेमध्ये इयता आठवी, नववी या वर्गात नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी - विद्यार्थीनींनी प्रवेश घेतला असून त्या नवगतांचे स्वागत ढोल - ताशांच्या गजरात पुष्पगुछ देऊन करण्यात आले.

    कार्यक्रमाच्या सुरुवातीस डि. ए. पाटील यांनी विद्यार्थ्यांना शाळेविषयीची माहिती व शाळेतील मुलांना देण्यात येणाऱ्या विविध सुविधांची माहिती करून दिली. शाळेचे मुख्याध्यापक दीपक कांबळे यांनी शाळेची निकालाची परंपरा शंभर टक्के कायम आहे. सर्व विद्यार्थ्यांकडे संपूर्ण लक्ष देऊन मार्गदर्शन व अभ्यासाची गोडी निर्माण करून निकाल शंभर टक्के लागण्यासाठी शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन मोलाचे आहे. सर्व शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी यांची ओळख नवीन विद्यार्थी - विद्यार्थिनींना करून दिली.

नवगतांच्या स्वागतासाठी मुख्याध्यापक दीपक कांबळेसर, प्रताप देसाई, डि. ए. पाटील. आर. एल. भोसले सौ. संजीवनी खराडे, सुनिल पाटील आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment