विद्यार्थ्यांचे "हरित" स्वागत : दि न्यू इंग्लिश स्कूलचा पर्यावरणपूरक उपक्रम, शाळा झाली ‘ग्रीन’: दि न्यू इंग्लिश स्कूलने घेतली पर्यावरण शपथ - चंदगड लाईव्ह न्युज

17 June 2025

विद्यार्थ्यांचे "हरित" स्वागत : दि न्यू इंग्लिश स्कूलचा पर्यावरणपूरक उपक्रम, शाळा झाली ‘ग्रीन’: दि न्यू इंग्लिश स्कूलने घेतली पर्यावरण शपथ

 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

    दि न्यू इंग्लिश स्कूल, चंदगड या नामवंत शिक्षणसंस्थेने पर्यावरणप्रेम आणि विद्यार्थ्यांमध्ये संवेदनशीलता निर्माण करणारा अभिनव उपक्रम राबवला. सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात इयत्ता पाचवी ते दहावीमध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत रोप देऊन करण्यात आले.

    या वेळी प्रत्येक विद्यार्थ्याला पाठ्यपुस्तके, वह्या, गणवेश यांसोबत वड, पिंपळ, चिंच, जांभूळ, गुलमोहर यासारख्या पर्यावरणपूरक रोपांचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांनी हे रोप शालेय परिसरात लावून त्यांचे संगोपन करण्याची प्रतिज्ञा घेतली.

    उद्घाटनप्रसंगी प्राचार्य आर. पी. पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. त्याच बरोबर पालकांचेही स्वागत करण्यात आले . यावेळी विद्यालयाच्या सेल्फी पॉईंट मध्ये सेल्फी घेण्याचा विद्यार्थ्यांना मोह आवरता आला नाही.

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्ही. के. गावडे यांनी केले. यावेळी उपमुख्याध्यापक म्हणून पदोन्नती मिळालेले व्ही. एन. कांबळे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच, नवीन बदली होऊन आलेले शिक्षक सुहास वर्पे, भूषण पाटील, वैशाली पाटील यांचे आणि चतुर्थश्रेणी कर्मचारी सुधाकर गणपते यांचेही स्वागत करण्यात आले.

    कार्यक्रमास सौ. पुष्पा सुतार, टी. व्ही. खंदाळे, जे. जी. पाटील, व्ही. एम. मोहणगेकर, वर्षा पाटील, विद्या डोंगरे, शारदा भोसले, विद्या शिंदे, ओंकार पाटील, रवी कांबळे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संजय साबळे यांनी तर आभार प्रदर्शन शरद हदगल यांनी केले.

No comments:

Post a Comment