चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
पालकांच्यामध्ये दिवसेंदिवस वाढत असलेले इंग्लिश मिडीयमचे आकर्षण आणि त्यामुळे घटत चाललेली प्राथमिक व माध्यमिक शाळेतील पटसंख्या याविषयी चर्चा करण्यासाठी व मातृभाषेतून शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी तसेच विद्यालयातून बदली झालेले शिक्षक व्ही. एन. कांबळे यांचा सत्कार समारंभ. असा संयुक्त कार्यक्रम शालेय समिती सदस्य ॲड. संतोष मळवीकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्र. मुख्याध्यापक यू. एल. पवार यांनी केले. यावेळी शालेय समिती चेअरमन रामाणा पाटील, नांदवडे गावचे सरपंच राजेंद्र कांबळे, उपसरपंच एन. एस. पाटील, शालेय समिती सदस्य एस. एस. शिंदे, सर्व ग्रामपंचायत सदस्य नांदवडे केंद्राचे केंद्रप्रमुख शिवाजी पाटील यांच्यासह सर्व पालक वर्ग, सर्व प्राथमिक शिक्षक व गावातील सर्व मान्यवर उपस्थित होते. भावेश्वरी विद्यालय नांदवडे येथे २५ वर्षे सेवा करुन चंदगड येथे उपमुख्याध्यापक म्हणून बदली झालेले व्हि. एन. कांबळे यांचा विद्यालय व ग्रामपंचायत यांच्यामार्फत सत्कार करण्यात आला. यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अध्यापिका सौ. एस. आर. कोरवी यांनी केले. पाहुण्यांचा परिचय अध्यापक पी. एम. कांबळे यांनी करून दिला तर आभार अध्यापक डी. जी. पाटील यांनी मानले.
No comments:
Post a Comment