आजरा: गोपाळ गडकरी, सी. एल. न्यूज
प्राथमिक शाळांच्या नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी 'शाळा प्रवेशोत्सव 2025' अंतर्गत श्री रवळनाथ प्राथमिक विद्यामंदिर येथे घेण्यात आलेला कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमासाठी जनता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक आण्णा चराटी, उपाध्यक्ष विलास नाईक, विजय पाटील, सल्लागार विजय बांदेकर, सौ. सुरेखा भालेराव, सौ. नुरजहाँ सोलापुरे उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे पुष्प व पुस्तके देऊन स्वागत करण्यात आले तसेच गोड खाऊ म्हणून चॉकलेट वाटून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. विजया पोतदार यांनी केले. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. उज्वला देसाई यांनी आपली मनोगत व्यक्त केले. यावेळी जेष्ठ शिक्षिका सौ. निलांबरी कामत, सहा. शिक्षिका सौ. रेश्मा कुराडे, सहशिक्षक सुरज बिद्रे व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. तसेच आदर्श बालक मंदिर व रवळनाथ बालक मंदिर च्या मुख्याध्यापिका सौ. साधना नारे व शिक्षक वृंद उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार प्राथमिक शाळेच्या कु. रविना घेवडे यांनी मानले.

No comments:
Post a Comment